एक गुजराती गृहमंत्री शिवसेनेला संपवण्याची भाषा करतोय; उद्धव ठाकरेंनी पत्रातून दिलं जळजळीत उत्तर

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन शिवसेनेला संपवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. शिवसैनिकांना लिहिलेल्याएका पत्राच्या माध्यमातून त्यांनी हे उत्तर दिलं. गुजराती गृहमंत्र्यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेला संपवण्याची भाषा केली आहे. त्याठिकाणी राणेसकट उपस्थित संपूर्ण मराठीजण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल असं म्हणत या पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक प्रकारची भावनिक साद घातली आहे. या पत्रानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात यांच्यात जोरदार राजकीय युद्ध पेटणार असल्याची चिन्ह दिसतायत.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे पत्रात?

जय महाराष्ट्र!!!!!!!!!
बाळासाहेबांचा एक शिवसैनिक…

देशाचे गृहमंत्री असणारे श्री. अमित शाह यांनी शिवसेना संपविण्याचे,हे जे वाक्य आहे ते त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यक्रमात उच्चरले त्या वेळेस नारायण राणे यांना सुद्धा हसू आवरले नसेल.कारण राणे त्यांनी मागील पंधरा वर्ष शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना काही जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना आपल्या गावात बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली.आणि म्हणून अमित शहा असे बोलले असतील, असं मला वाटले.

एक गुजराती माणूस महाराष्ट्रत येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणेसकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठीजण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल.

आता शिवसेनेचे सर्वच विषय काही मराठी माणसाला भले पटत नसतील, पण 19जून 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली,तेव्हा विशेष करून मुंबई आणि लगतच्या ठाणे परिसरात मराठी माणसाची परिस्थिती खूप वाईट होती. भाषांवार प्रांतरचने मुळे मुंबई मराठी माणसाला मिळावी,त्या साठी 105 मराठी माणसे हुतात्मे झाले.

पण मुंबई ची आर्थिक नाडी त्या वेळेस परप्रांतीयांच्या हातात होती. मराठी माणसा कडे तेव्हा कोणतेच उद्योग नव्हते,चांगले शिक्षण नव्हते त्यामुळे सरकारी नोकरीत मराठी माणूस खालच्या पदावर काम करत होताआणि ही सर्व परिथिती बघून वंदनीय बाळासाहेब अस्वस्थ व्हायचे आणि त्यातून जी क्रांती झाली,त्याच नाव शिवसेना तो शिवसेनेचा सर्व इतिहास आपणा सर्वाना माहीतच आहे.

आणि तेव्हा शिवसेना आणि फक्त शिवसेनाच मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर होती, म्हणून आज मराठी माणूस मुंबई शहरात ताठ मानेने उभा आहे, हे कोणीही नाकारू शेकत नाही. आता पिढी बदलत आहे, पण इतिहास मात्र बदलत नसतो.

जय महाराष्ट्र!!

सदर वृत्त टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने दिलं आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here