हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील.
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या क्षेत्राला दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तसेच व्यापारी वर्गाला काही मिळणार का याकडे देखील लक्ष असेल.
दरम्यान, राज्यात काल 20,295 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 443 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.65 टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल 20,295 नवीन रुग्ण सापडल्यानंतर सद्यस्थितीत 2,76,573 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,13,215 झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.