हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा केली. “येत्या २०२५ पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाईल. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मला आता कामं करण्याची घाई आहे, इतके दिवस मला या शहराने खूप दिलं, मला आता कामं करायची घाई आहे. भूमिपूजन झालं, कुदळ मारली इथे कामं संपलं नाही. निवडणुका आल्या म्हणून काय कामं करायची नाहीत का?, हातात घेतलेलं कामं पूर्ण करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. रिमोटद्वारे हे उद्घाटन करण्यात आले. त्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलं. ज्यांच्या हातात सत्तेचं रिमोट कंट्रोल होतं. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोलमुळे होत होती. त्यांच्या नावाने असलेल्या उद्यानाचे रिमोटद्वारे उद्घाटन करावं लागतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले
लोक मला आमचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात. पण मला लाड वगैरे नको आहे. मला केवळ तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असंही ते म्हणाले. कोरोना काळात मी घरात बसून काम केली, असंही त्यांनी सांगितलं. तसेच पाणी पुरवठा योजना आता मार्गी लागली आहे. आता शहरातील गुंठेवारीचा प्रश्नही सोडवण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’