हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळं लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंची सर्व दुकान २४ सुरु ठेवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. वर्षा निवासस्थानी करोना उपाययोजनांसंदर्भात आज मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आला. गेले काही दिवस दुकानांवर होणारी गर्दी पाहता याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांमध्ये संभ्रम असून लोक भीतीनं दुकानांवर जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करताना दिसत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेत लोकांची गैरसोय होऊ नये तसेच गर्दी टाळण्यासाठी आता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरु ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार आता औषध, किराणा दुकान तसेच इतर जीवनाश्यक वस्तूंची दुकान आता २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच ज्यावेळी ग्राहक दुकानावर वस्तू खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळी दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळायच्या आहेत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. दुकानदारांना आपली २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी देत असताना गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर ग्राहक आता कुठल्याही वेळी जाऊन वस्तू विकत घेऊ शकणार आहेत त्यासाठी गर्दी करण्याची गरज नाही आहे. तर दुकादारानी भीतीनं काही ठरविक कालावधीतच दुकान सुरु ठेवण्याची गरज नाही आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.