शेतकरी आंदोलनावरून सरकारच्या सुरात-सूर मिसळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काँग्रेसचा टोला, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. दरम्यान त्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ट्विट करत या वादात उडी मारली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.

या सगळ्यावर आक्षेप घेत सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? , असा सवाल करत यापाठीमागे बीसीसीआय, असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी केला आहे.

कार्ती चिदंबरम हे देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. बीसीसीआय आपल्या क्रिकेटपटूंना जबरदस्तीने शेतकरी आंदोलनावर ट्विट करायला लावत आहे. हे खूपच बालीश आहे. बीसीसीआयने हे थांबवायला हवं किंबहुना असं करु नये, असं कीर्ती चिदंबरम यांनी म्हटलंय.

नक्की काय म्हणाले भारतीय क्रिकेटपटू –

कर्णधार विराट कोहली म्हणाला, या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.

रोहित शर्माने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची कायम महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू. एकजूटीने कोणत्याही समस्येवर तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like