शहरात 75 हजारांहून अधिक गणेश मुर्तीचे संकलन, विसर्जन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विरूद्ध लढत आहे. अजूनही कोरोना चा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. याच पार्श्वभूमीवर याही वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनपा द्वारे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये शहरातील 9 झोन मध्ये 40 ठिकाणी गणपती संकलन त्याचबरोबर शहरातील नऊ विहिरी आणि स्मृतीवन तलावात विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. याअंतर्गत शहरात एकूण 75 हजार 826 मूर्तींचे मनपाने संकलन करून विसर्जन केल्याची माहिती मनपा प्रशासनाने द्वारे देण्यात आली. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार झालेला नाही असेही मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मनपातर्फे दरवर्षी शहराच्या विविध भागात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली जाते. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी पासुन गणेश मूर्ती संकलन केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाने हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरात 9 झोन मध्ये एकूण 40 ठिकाणी गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली होती. कोरोनाच्या तिसरा लाटेच्या पार्श्‍वभूमीवर गणेश विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विसर्जन विहिरीवर न जाता मनपा कर्मचाऱ्यांकडे मुर्त्या द्याव्यात, असे आवाहन मनपा द्वारे करण्यात आले होते. मनपाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी शिस्तीचे पालन करत गणेशमूर्ती जमा केल्या. रविवारी सकाळी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून 40 वाहने मुर्ती संकलनासाठी रवाना झाली होती.

झोन निहाय संकलन –
झोन 1 – 575, झोन 2 – 9938, झोन 3 – 22,777, झोन 4 – 5436, झोन 5 – 3812, झोन 6 – 5949, झोन 7 – 18,832, झोन 8 – 4366, झोन 9 -4139
एकुण – 75,826

Leave a Comment