Sunday, February 5, 2023

आ. निलेश लंकेची अँब्युलन्समधून एंन्ट्री : सातारा जिल्ह्यात कोरोना सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात स्वतः रूग्णवाहिका चालवली

- Advertisement -

फलटण | फलटण तालुक्यातील येथे आयुर उद्योगसमूहाचे दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या 1 हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे आ. निलेश लंके आरोग्य मंदिर असे नामकरण व लोकार्पण सोहोळा आ. निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी स्वतः रुग्णवाहिका ही चालवत दमदार एंन्ट्री केली.

यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील, सुभाषराव शिंदे, दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, डॉ. वल्लभ कुलकर्णी यांच्या सह विविध गावचे सरपंच व अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

आ. निलेश लंके म्हणाले, फलटण तालुक्यातील रुग्ण आमच्या कोवीड सेंटरमध्ये येवून भरती झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच दिवशी संध्याकाळी दिगंबर आगवणे त्या पेशंटला भेटायला पारनेरला आले. फलटणमध्ये आम्ही कुठे कमी पडतोय? हे जाणून घेण्याची त्यांची तळमळ होती. आपल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी ते तात्काळ इतक्या लांब आले. यातून त्यांची फलटण वासियांबद्दल असलेली आत्मियता स्पष्ट दिसून आली. राजकारणात यश येवो अथवा न येवो, समाजासाठी आपण सदैव कार्यरत राहिले पाहिजे. दिगंबर आगवणे यांचे समाजाप्रती असणारे प्रेम, आपुलकी मला पहायला मिळाली.