एसटी आर्थिक संकटात, उद्यापर्यंत कामाला या; अनिल परब यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे.

विलीनीकरणाबाबत सरकारची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. पगारवाढीबाबतचा लेखाजोखा देखील कालच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई कुठेतरी थांबवायची असते , त्यामुळे काही कामगारांची कामावर यायची इच्छा आहे. त्यांना मी आवाहन करतो की उद्यापर्यंत कामावर या, त्यांनतर किती कामगार येतात यावरून पुढील काम कस करायचं याचा निर्णय होईल.

BJP ने काढता पाय घेतला असला तरी ST आंदोलन सुरूच; विलीगीकरणाशिवाय लालपरीची चाकं फिरू देणार नाही

विलीनीकरण ची मागणी ही हायकोर्टाने नेमलेल्या समिती समोर आहे. त्यासाठी 12 आठवड्याचा कालावधी दिला आहे. आणि तोपर्यंत संप करणं हे एसटीला परवडणारे नाही आणि कामगारांना देखील परवडणारे नाही. त्यामुळे दोघांचे पण नुकसान होणार आहे. एसटीची अवस्था वाईट आहे. आर्थिक संकट असून देखील सरकारने ऐतिहासिक पगार वाढ केली आहे त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावे असे अनिल परब यांनी म्हंटल.

सदाभाऊ – पडळकर यांचे आंदोलन स्थगित

दरम्यान, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. मात्र एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. आंदोलनाला पहिल्या टप्प्यात मिळालेलं यश मोठे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Leave a Comment