हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण प्रकरणे सुमारे ६० हजारांपर्यंत पोहोचली आहेत. भारतातील पहिल्या प्रकरणाच्या नोंदी नंतर पुढील ३० दिवस तुलनेने शांत राहिले. त्यानंतर मात्र या प्रकरणांच्या संख्येत हळूहळू वाढ झाली.पहिल्या ५० दिवसांत भारतात २०० पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच प्रकरणांच्या वाढीस वेग आला आहे आणि मेच्या सुरुवातीच्या दिवसांत तर भारतात दररोज २,००० हून अधिक संक्रमणाच्या रिपोर्ट्स येत आहेत, जे आता गेल्या ३-४ दिवसांत ३००० च्या वर गेले आहेत.
९ मे रोजी भारतातील कोरोना विषाणूच्या साथीचा आज १०० वा दिवस आहे.३० जानेवारीला केरळमधील थ्रिसूरमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थी चीनच्या वुहानमधून परत आला आणि त्याने ताप तसेच घशाला सूज आल्याची तक्रार केली.या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली. भारतातील कोरोनाचे हे पहिले प्रकरण होते. आता दररोज ३,००० हून अधिक रिपोर्ट्स समोर येत आहेत.
वेगाने वाढणाऱ्या या घटनांमुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे की भारतात कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरु झाला आहे का? त्या दृष्टीने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) देशातील जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये याचा अभ्यास सुरू करण्याचा विचार करीत आहे जिथे बहुतेक कोविड -१९ ची प्रकरणे आढळून आली आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरु झाले आहे की नाही हे शोधण्यासाठीचा हा अभ्यास आहे.
सर्व ७५ हे जिल्हे रेड झोनचा भाग आहेत. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, आग्रा, अहमदाबाद यासारख्या शहरांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, केवळ मुंबईतच १२ हजाराहून अधिक प्रकरणे आहेत. दिल्लीत ६ हजारांहून अधिक आणि अहमदाबादमध्ये ५ हजारांहून अधिक प्रकरणे आहेत. पुणे आणि ठाण्यात तब्बल २ हजाराहून अधिक प्रकरणे आहेत. इंदूरमध्ये १७०० पेक्षा जास्त, जयपूरमध्ये एक हजाराहून अधिक, जोधपूर आणि सूरतमध्ये ८००-८०० पेक्षा जास्त आणि आग्रामध्ये ७०० पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे आहेत.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ३३२० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर १३०७ लोक यातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी पहाटेपर्यंत देशभरात एकूण कोरोना विषाणूचे प्रमाण वाढून ५९,६६२ झाले आहे.
या प्रकरणांमध्ये अशी १७८४६ प्रकरणे अशी आहेत जी कोरोना विषाणूचा पराभव करून पूर्णपणे बरे झाली आहेत, जरी या प्राणघातक विषाणूने देशभर १९८१ लोकांचा बळी घेतला आहे. शुक्रवारी सकाळी पर्यंत, देशभरात कोरोना विषाणूची एकूण संख्या ५६,३४२ झाली आहे आणि बरे झालेल्या लोकांची संख्या ही १६,५३९ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.