EPFO मध्ये Nomination पूर्ण करण्याची प्रक्रिया अशी करा पूर्ण

EPFO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक खाते, भविष्य निर्वाह निधी, म्युच्युअल फंड इत्यादीसारख्या अनेक आर्थिक गुंतवणुकीशी निगडित असलेल्या संस्थांमध्ये नॉमिनी म्हणजेच वारसदारांचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया उपलब्ध असते. जर एखाद्या आर्थिक व्यवहारात तशी सुविधा उपलब्ध नसल्यास आपण त्या बाबतीत आवश्यक त्या कागदपत्रांचा पाठपुरावा करून त्याबाबतची प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरतेच्या दिशेने एक एक यशस्वी पाऊल पुढे टाकताना त्यातील बारकावे समजून घेण्याच्या उद्देशाने आम्ही वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतो .आजच्या आमच्या लेखातून आम्ही तुम्हाला EPFO मध्ये कश्याप्रकारे वारसदाराचे नाव समाविष्ट शकता हे जाणून घेणार आहोत.

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) मध्ये वारसदाराचे नाव समाविष्ट करणे. खूप महत्वाचे आहे कारण हीच प्रक्रिया हे सुनिश्चित करते की तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तुमचा मृत्यू झाल्यानंतरच वारसदार म्हणू नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला दिली जाईल. EPFO ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था आहे, जी देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि विमा योजनांचे व्यवस्थापन करते. जर आपण ईपीएफओमध्ये ई-नोंदणीच्या प्रक्रियेबद्दल बोललो, तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा फोटो आणि आधारकार्ड त्या पोर्टलवर अपलोड करावा लागेल. आधार कार्डवरील संपूर्ण माहिती तंतोतंत समाविष्ट केल्यावर सदस्याचे नाव, जन्मतारीख व्यवस्थित तापासून पहावे .ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे एक PDF तयार होते. ज्यावर सदस्याने आधारशी लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येतो त्या ओटीपीच्या माध्यमातून सदस्यांची ओळख पटल्यावर उपलब्ध पीडीएफवर स्वाक्षरी करावी लागते .

योग्य वारसदारचे समाविष्ट करण्याची प्रक्रिया हे सुनिश्चित करते की कुटुंबातील सदस्याकडे त्याचा/तिचा मोबाईल नंबर आहे जो सदस्याच्या निधनानंतर ऑनलाइन दावा दाखल करण्यासाठी आधारशी जोडलेला आहे. मग तुम्ही त्या मोबाईलवर OTP द्वारे लॉगिन करू शकता.

जर आपण ई-साइन प्रक्रियेबद्दल बोललो, तर यासाठी ई-साइन लिंकवर नाही. यानंतर तुम्हाला चेक बॉक्स निवडावा लागेल. पुढील पृष्ठावर, तुम्हाला आधार आधारित ई-ऑथेंटिकेशन, आधार क्रमांक आणि व्हर्च्युअल आयडीचे दोन पर्याय मिळतील.

आयडी टाकल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. यानंतर तुम्हाला OTP टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सबमिट पर्याय निवडावा लागेल. यानंतर नॉमिनेशनचे तपशील तुमच्या EPFO ​​च्या डेटाबेसमध्ये सेव्ह केले जातील.