Wednesday, June 7, 2023

वर्ध्यात चोरटयांनी संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्ध्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सिंदी शहरातील नामांकित दोन शाळेत पहिल्यांदाच झालेल्या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये चोरटयांनी (Stolen) शाळेतील संगणकासह विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी असलेले ताटही लंपास केले आहेत. या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे चोरटे (Stolen) शाळेत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सिंदी शहरातील नामांकित केसरीमल नगर विद्यालय तसेच पालिकेच्या टिळक प्राथमिक शाळेत चोरीची (Stolen) घटना घडली आहे.

या विद्यालयातून चोरटयांनी लॅपटॉप, मॉनिटर, पीसीओ, प्रिंटर, बायोमेट्रिक थंम मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा आदी सर्व लंपास केले. चोरी गेलेला मुद्देमाल 41 हजार 440 रुपयांचा असल्याचे समजत आहे. तसेच टिळक प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या 512 प्लेट (ताट) लंपास करण्यात आले आहे. तो मुद्देमाल 10 हजार 200 रुपयांचा असल्याचे समजत आहे. या दोन्ही चोऱ्यांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सिंदी पोलिसात या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोर कैद झाले आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. या चोरट्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं