नवी दिल्ली | ३७० कलमा मधील दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर केल्या नंतर आज काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या विरोधासाठी मैदानात उतरलेले काँग्रेसचे गटनेते लोकसभेत भलतेच वक्तव्य करून गेले आहेत. त्याच्या या वक्तव्याने काँग्रेस टीकेची धनी ठरली. तसेच सोनिया गांधी देखील गरबडून गेल्या.
कश्मीर हा भारतातील अंतर्गत मुद्दा नसून तो अंतरराष्ट्रीय मुद्दा आहे तसेच १९४८ पासून संयुक्त राष्ट्र संघ यावर लक्ष ठेवून आहे असे खळबळ जनक वक्तव्य काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमित शहा यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. पाक व्यप्त काश्मीर बद्दल काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे असे म्हणून अमित शहा यांनी कश्मीरसाठी जीव द्यावा लागला तरी देण्याची तयारी आहे असे म्हणले.
या विधेयकाचा विरोध करण्यासाठी उभा राहिलेल्या सोनिया गांधी यांना अधिररंजन चौधरी यांच्या वक्तव्याने पुरते गांगरून सोडले होते. त्यांना काय बोलावे याबद्दल जरा वेळ काही सुचत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. दरम्यान ३७०च्या मुद्द्यवरून काँग्रेसमध्येच दोन गट असल्याचे बोलले जाते आहे. तरुण नेते सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांनी जुन्या जाणत्या बुजुर्ग नेत्यांनी रोखून धरले आहे असे बोलले जाते आहे.