हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ असं लिहीत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदविला आहे.
पुण्यातील कोथरुड परिसरात काँग्रेसकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांचा एडिट केलेला फोटो असून त्यावर भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ असा उल्लेख करण्यात आला आहे. या या बॅनरची सध्या संपूर्ण पुणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
राजकीय भूकंप?? भाजपचे 7 आमदार काँग्रेसच्या संपर्कात
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/IdukgePAln#hellomaharashtra @INCIndia
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 10, 2022
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते
पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले होते .