हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी मोदींनी मेट्रोतील उपस्थित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मोदींच्या या कृतीवरून काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला. रविवारी कोणती शाळा असते ओ मोदी साहेब? असा सवाल काँग्रेसने केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर गरवारे मेट्रो स्थानक ते आनंदनगर मेट्रो स्थानक पर्यंत प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रो मधील उपस्थिती विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत संवाद साधला. तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे? तुम्ही कोणत्या शाळेत शिकता असे प्रश्न मोदींनी विद्यार्थ्यांना विचारले. मात्र रविवार असताना मुले शाळेत कशी गेली असा सवाल काँग्रेसने केला आहे.
रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं)
तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?#महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा pic.twitter.com/sksMUI3yOB— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 6, 2022
रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? असा सवाल काँग्रेस ने केला तसेच यावेळी #महाराष्ट्रद्रोहीमोदीपरत_जा … असा हॅशटॅग ही वापरण्यात आला.