हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्द्यांवरून मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही 12 सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ मनमोहन सिंग यांना 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान करावे अशी मागणी मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता असलेल्या दत्तू गवाणकर यांनी केली आहे.
दत्तू गवाणकर यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सुशिक्षित आणि अनपढ यांच्यातील फरक लक्षात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
देश फक्त सहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ मनमोहन सिंग यांच्या हाती द्या…
बघा सर्व स्थिती कशी नियंत्रणात येईल..!!
"सुशिक्षित आणि अनपढ़ याच्या मधला फरक सुद्धा लक्षात येईल"
— 𝙳𝚊𝚝𝚝𝚞 𝙶𝚊𝚟𝚊𝚗𝚔𝚊𝚛 दत्तू गवाणकर (@GavankarDattu) May 12, 2021
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदींवर निशाणा साधला होता. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो” असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकार वर जोरदार टीका केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.