विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण?; उद्या अर्ज भरण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावांवर चर्चा केली जात असताना आता अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नक्की झाले असून ते उद्याच विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चव्हाण यांनी आज थेट दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील ’10 जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या चार मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत आहे.

राज्य सरकारच्यावतीने काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमानुसार उद्या दि. 27 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भराव्याचा आहे. तर त्यानंतर दि. 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

यावेळेस विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आले असल्याने काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नववनवर चर्चा केली जात असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचे नाव अध्यक्षपदासाठी अंतिम करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, चव्हाण यांनी आज थेट दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या चार मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत आहे. त्यामध्येच पृथ्वीराज चव्हाण यांचंदेखील नाव आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.

कोण आहेत पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरचा. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीत झालं. त्यांनी राजस्थानच्या बीआयटीस पिलानीमधून बीई-ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमएसची पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं. त्यांचे वडील इंदोरच्या होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही होते.