अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक अहंकार असल्याचे लॉकडाउननं सिद्ध केलं- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली  । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कोरोना रोखण्याच्या धोरणांवर संदर्भात टीकास्त्र सोडले आहे. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या वाक्याचा आधार घेत अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे आणि हे या लॉकडाउनने सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ट्विटवर ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

यापूर्वीही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लॉकडाउन असतानाही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कशी वाढते आहे, हे दाखवून देण्यासाठी ४ ग्राफ ट्विट केले होते. देशात वारंवार लॉकडाउन लागू केले जात आहेत, मात्र त्यांचा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. उलट कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेच आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी या ग्राफ्ससोबत अज्ञाताच्या नावे एक वाक्य देखील शेअर केले होते. ‘वेडेपणा हा पुन्हा पुन्हा एकच काम करत आहे आणि विविध परिणामांची अपेक्षा करत आहे. असे ते वाक्य होते. जेव्हा पहिल्यांदा देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला, तेव्हा देशभरात फक्त ९ हजार कोरोनाबाधित रुग्ण होते, असं राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या ग्राफच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

तर पुढील लॉकडाउनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जाऊन ती २८ हजारांवर जाऊन पोहोचली. त्या प्रमाणे जेव्हा देशात तिसऱ्यांदा लॉकडाउन लागू करण्यात आला, त्यावेळी करोनाबाधितांची संख्या ४५ हजारांवर पोहोचली होती. तर देशात जेव्हा चौथा लॉकडाउन लागू करण्यात आला, त्यावेळी करोनाबाधितांची संख्या ८२ हजार ५०० वर पोहोचली असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी ग्राफ्सच्या माध्यमातून केला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment