हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. मात्र, त्या स्प्र्रदकांच्या सत्कार समारंभात लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून काँग्रेस नेत्याने मोदींवर निशाणा साधला आहे. “टोकियो ऑलिम्पिकमधील पदक काय मोदींनी जिंकून आणलय का? असा खोचक सवाल युवक काँग्रेस नेत्याने विचारला आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकल्यानंतर विजेते खेळाडू नीरज चोप्रा, त्यांचे नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी एका हॉटेलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी लावलेल्या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा लावण्यात आला होता. यावरून ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली. तर युवक काँग्रेसचे नेते श्रीनिवास बी व्ही यांनी ट्विट करीत मोदींना टोला लगावला आहे.
मेडल मोदी जी जीतकर लाये है? pic.twitter.com/taUykaLCuU
— Srinivas BV (@srinivasiyc) August 9, 2021
पदक विजेत्यांच्या सत्काराच्या कर्यक्रमातील मोदींच्या फोटोची चांगलीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. या फोटोच्या प्रकरणावरून ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.