मंगळावर जाणारे सॅटेलाइट हॅक होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही? ; काँग्रेस नेत्याची ईव्हीएम वर शंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून निकालाचे कल समोर येऊ लागले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदीत राज यांनी ईव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ शकतं तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे, ट्विटमधून त्यांनी ईव्हीएम मशीनचा थेट संबंध चंद्र आणि मंगळ ग्रहाशी जोडला आहे. चंद्र आणि मंगळावर जाताना त्या उपक्रमाची दिशा जर पृथ्वीवरून नियंत्रित केल्या जाऊ शकते तर ईव्हीएम का हॅक केल्या जाऊ शकत नाही?असा सवाल त्यांनी केला . यावेळी त्यांनी ईव्हीएमला ‘एमव्हीएम’ म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशीन’ असं नाव दिलं होतं.

 

पुढे ते म्हणाले की, ‘भाजपा, जेडीयू उमेदवारांना लोक ऐकत नव्हते, मारुन पळवत होते, मोदींच्या रॅली फ्लॉप होत होत्या, नितीश कुमार यांना कोणी ऐकण्यासही तयार नव्हतं आणि अनेक ठिकाणी जनतेन रोष व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत महागठबंधन २०० जागांच्या जवळ पोहोचला तर आश्चर्य व्यक्त होण्याचं कारण नव्हतं. प्रत्येक गल्ली, नाक्यावर विरोध होत असताना मग ही मतं कुठून मिळत आहेत, मला काहीतरी गडबड दिसत आहे”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment