राजीव गांधी फाऊंडेशन चौकशी प्रकरण; मोदीजी काहीही करा पण आम्ही घाबरणार नाही- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राजीव गांधी फाऊंडेशनसह नेहरु-गांधी कुटुंबीयांशी संबधित ३ ट्रस्टच्या चौकशीसाठी मोदी सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबीयांशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या ३ संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. या फाउंडेशनच्या 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या आर्थिक मदतीबाबत चौकशी केली जाणार आहे. मोदी सरकारने घाबरवण्यासाठी ही कारवाई केल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं तर, “मिस्टर मोदी यांना वाटतं की सर्व जग त्यांच्यासारखं आहे. त्यांना असं वाटतं की, प्रत्येकाची काही किंमत आहे किंवा प्रत्येकला घाबरवलं जाऊ शकतं. मात्र ते कधीही हे समजू शकणार नाही की सत्यासाठी जे संघर्ष करतात त्यांना घाबरवलं जाऊ शकत नाही.”

2005-06 मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या सत्ताधारी भाजपने राजीव गांधी फाऊंडेशनला 30 लाख अमेरिकी डॉलर्सचा निधी दिल्याचा आरोप आहे. चीन सीमेवरच्या घटनेनंतर राहुल गांधी जेव्हा आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारु लागले, त्यानंतर भाजपनं हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस आणि चीनचे गुप्त संबंध असल्याचा आरोपही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला होता. शिवाय याच मदतीच्या बदल्यात भारत आणि चीनमधल्या व्यापारी संबंधात अनुकूलता दिली गेली, असाही भाजपने आरोप करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारनं प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे. ईडीचे संचालक या समितीचे प्रमुख असणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”