हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
राहुल यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो” असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकार वर जोरदार टीका केली आहे.
वैक्सीन, ऑक्सीजन और दवाओं के साथ PM भी ग़ायब हैं।
बचे हैं तो बस सेंट्रल विस्टा, दवाओं पर GST और यहाँ-वहाँ PM के फ़ोटो।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 13, 2021
यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून केंद्रावर हल्लाबोल केला आहे. “सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं होत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.