नवी दिल्ली । भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून टीकात्मक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी आपली शक्तिशाली असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. आज त्यांची मोठी ताकद पण, भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे” असं म्हणत राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावर मोदींच्या भूमिकेवर टीका केली आहे.
”चीनने सुरु केलेला सीमावाद हा पूर्वनियोजित आहे. हा वाद भारताच्या पंतप्रधानांवर दबाव टाकण्यासाठी आहे. ते विशिष्ट प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते जे काही करत आहेत, तर तो आहे प्रतिमेवर हल्ला. त्यांना माहिती आहे की, प्रभावी राजकारणी राहणं ही नरेंद्र मोदी मजबूरी आहे. त्यांना आपल्या ५६ इंची प्रतिमेला कायम ठेवावं लागणार आहे. आणि हाच मूळ विचार आहे, ज्यावर चीन हल्ला करत आहे” असं राहुल गांधी यांनी व्हिडिओत म्हटलं.
PM fabricated a fake strongman image to come to power. It was his biggest strength.
It is now India’s biggest weakness. pic.twitter.com/ifAplkFpVv
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2020
चीन मुळात नरेंद्र मोदी यांना हेच सांगतोय की, चीनला जे हवय ते तुम्ही करणार नसाल, तुमची बलवान नेत्यांची प्रतिमा नष्ट करू. त्यामुळे असा प्रश्न शिल्लक राहतो की, पंतप्रधान मोदी काय उत्तर देणार? ते चीनचा सामना करणार का? ते चीनचं आव्हान स्वीकारणार का? आणि नाही म्हणणार का? मी भारताचा पंतप्रधान आहे आणि मी माझ्या प्रतिमेचा विचार करत नाही. मी तुमचा सामना करेल असं म्हणणार की ते त्यांच्यासमोर शस्त्र टाकून देणार? माझी आतापर्यंतची चिंता ही आहे की, जर पंतप्रधान दबावाखाली आले तर, माझी चिंता ही आहे की, चीन आपल्या हद्दीत बसला आहे. आणि पंतप्रधान जाहीरपणे असं सांगत आहे की, चीन भारतीय हद्दीत आलेला नाही. त्यामुळे मला स्पष्टपणे जाणवतय की ते आपल्या प्रतिमेविषयी चिंतेत आहेत. प्रतिमा सुरक्षित ठेवण्यावर त्यांचा भर आहे. जर ते चीनला हे समजण्याची देणार असतील की, ते त्यांच्या प्रतिमेमुळे चिंतेत आहेत, तर पंतप्रधान जास्त काळ देशाच्या कामाचे राहणार नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
“आता आपण मुत्सद्दी पातळीवर विचार केला, तर चीन आपली बाजू मजबूत करत आहे. मग ते गलवान असो, डेमचोक असो की, पॅगाँग व्हॅली, मजबूत स्थिती तयार करायची हा त्यांचा निर्धार पक्का आहे. ते आपले महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते काही मोठा विचार करत आहेत, तर ते काहीतरी करू इच्छित आहेत. “भारत-चीन मधील हा सर्वसाधारण सीमावाद नाही. माझ्यासाठी चिंतेची बाब ही आहे की चीन आपल्या हद्दीत येऊन बसला आहे. रणनीतीशिवाय चीन कोणतंही पाऊल उचलत नाही. त्यांच्या डोक्यात नकाशा तयार झालेला आहे. ते आता स्वतःच्या मनाप्रमाणे त्याला आकार देत आहेत. जे त्यांना हवय तेच ते करत आहेत. त्यामध्येच ग्वादर, बेल्ट एंड रोडचा समावेश आहे. हे एकप्रकारे ग्रहाची पुर्नरचनाच आहे. त्यामुळे जेव्हा आपण चीनविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला हे समजून घ्याव लागेलं की चीन कशापद्धतीनं विचार करतोय,” असं राहुल गांधी व्हिडीओत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”