श्रीमान 56 इंच छातीवाले घाबरले का?; राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकावर विरोधकांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान आज चीनच्या सीमेवरील वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली आहे. कारण केंद्र सरकारकडे कोणतीही रणनीती नाही आणि श्रीमान 56” घाबरले आहेत. केंद्र सरकार खोटे बोलत आहे, मात्र आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालतायेत,” असे गांधी यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे. कारण केंद्र सरकार कडे कोणतीही रणनीती नाही आणि श्रीमान 56” घाबरले आहेत. केंद्र सरकार खोटे बोलत आहे, मात्र आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालतायेत,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला.