शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल ; महाराष्ट्रातील जेष्ठ काँग्रेस नेत्याने दर्शवला पाठिंबा

0
41
Sharad Pawar Pm
Sharad Pawar Pm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती. खुद्द काँग्रेसनेच ही ऑफर पवारांना दिली आहे असेही समजलं होत. दरम्यान खुद्द शरद पवारांनीच या बातमी मध्ये काही तथ्य नाही असं सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अस असूनही अजूनही पवारांच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातच काँग्रेसचे महाराष्ट्रातील जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल”, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजचा सोहळा म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शनाचा हा सोहळा आहे. त्यांनी 50 वर्षांत अनेक चढ उतार बघितले. त्यांनी अनेक व्यक्तींसोबत काम केलं. त्यांचा अनुभव मोठा आहे. शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल”, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय.

“शरद पवार यांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांच्या नावासकट त्यांना ते लक्षात ठेवतात. पक्षातील कार्यकर्ता आणि नेता कुणालाही ते सहज उपलब्ध होतात. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार. पवारसाहेब आजही देशाचं नेतृत्व करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. असा माणूस जर युपीएचा अध्यक्ष झाला तर मला नक्की आवडेल”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच – संजय राऊत

“शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटल होत. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही”.असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here