सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राज्यातील महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयम पाळला पाहिजेल. स्थानिक पातळीवर आपसा मध्ये समनव्य आणि संयम असावा, आपल्या वर्तनाचा परिणाम महाविकास आघाडीच्या व्यवस्थेला धक्का लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये कदम हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यानमध्येच प्रवेश सुरू आहेत, याचा परिणाम महाविकास आघाडीवर होऊ नये, याची काळजी घ्यावी अस ही त्यांनी सांगितल. त्याच बरोबर भाजप आणि राष्ट्रवादी मधील अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याचा गौपयस्फोटही त्यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, अनेक संकटे येऊनही महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार खंबीरपणे उभे आहे. लोकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी मोठी मदत सरकारने केली आहे. जिल्ह्यात सात कोटींचा निधी आम्ही मयनोरीटी माध्यमातून दिला आहे. यामधून अनेक कामे पूर्ण होणार आहेत असे कदम यांनी सांगितले.
तसेच येणाऱ्या काळात कृष्णा नदीवर बुरलीआणी संतगाव या गावांना जोडणारा ३५ कोटींचा मोठा पूल मंजूर केला आहे. तांत्रिक मान्यता आल्यानंतर लवकरच काम सुरू होईल. पूर रेषेच्यावर हा पूल बंधण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासात आणखी भर टाकण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करत आहे असे कदम यांनी सांगितले.
मंत्र्यांना समानातेनुसार निधी वाटप होत आहे. निधी वाटपावरून काँग्रेस मध्ये नाराजी नाही. या सर्वांवर मुख्यमंत्री, महसूल मंत्री लक्ष ठेऊन आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी पाच ते दहा कोटी रुपये खर्चून रिसर्च लॅबोरेटरी उभारणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.