हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्याच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावर भाष्य करताना नाथाभाऊ सारख्या जेष्ठ नेत्याची जी अवहेलना झाली ती त्यांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला असं म्हटलं आहे. तसेच अजून काही भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याने भाजप मध्ये अस्वस्थता वाढली आहे असेही थोरात म्हणाले.
नाथाभाऊंचं मोठं योगदान भाजपासाठी होतं. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं काम उल्लेखनीय आहे. अशा नेत्यांना ज्यांनी सत्ता आणण्यासाठी मदत केली त्यांची जी अवहेलना झाली ती खडसेंना सहन झाला नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजपात गेलेले अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत त्यामुळेच भाजपात अस्वस्थता आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून अनेक जणांनी भाजपाची वाट धरली होती. मात्र भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं.
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रथमच बोलले अजित पवार ; म्हणाले की…
वाचा सविस्तर-👉🏽https://t.co/cVmdp0PnJc
@EknathKhadseBJP @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 16, 2020
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडत आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत यावर शिक्कामोर्तब केलं. एकनाथ खडसेंनी पक्ष उभारणीसाठी आणि २०१४ मध्ये भाजपाला विजयी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवलं. त्याचमुळे एकनाथ खडसे यांनी असा निर्णय घेतला असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजपामध्ये एकनाथ खडसे गेल्यानंतर एक अस्वस्थता पसरली आहे. अनेक अस्वस्थ झालेले पक्षातले लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’