हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांची गुप्त घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेना उधाण आले आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय खळबळ उडाली असताना काँग्रेसने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही अस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल.
नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे कोणी कोणालाही भेटू शकतं. या सर्व नेत्यांनी एकमेकांसोबत काम केलेले आहे. ते एकमेकांना कधीही भेटू शकतात. त्यांची मैत्रीसुद्धा आहे. म्हणून आम्ही त्या भेटीला राजकीय भेट असं गृहीत धरत नाही अस म्हणत भाजपचे नेते भविष्यवाले आहेत. मी भविष्यवाला नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
संजय राऊत – आशिष शेलार गुप्त भेट ??
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांची गुप्त घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेना उधाण आले आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा करत आपल्याला याबाबत काही माहिती नाही असं दरेकरांनी म्हंटल.