हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने ज्यांना ‘पॉवर’ दिली त्यांनीच घात केला असे नाना पटोले यांनी म्हंटल.
काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे
तसेच, “सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. देशामध्ये भाजपाला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो. हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वचं २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होईल.” असंही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.