हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी केंद्रावर सडकून टीका केली. या देशाला 2014पासूनच ग्रहण लागलं आहे. ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. ते लोक सत्तेत बसले आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे नाना पटोले यांनी म्हंटल.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांचं योगदान नाही आणि त्या विचारसरणीचे लोक आज सत्तेत बसले आहेत. मोठ्या कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही मोडीत काढण्याचं काम सध्या करत आहेत. लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावं, असंही आवाहन नाना पटोलेंनी केलं आहे.
अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 साली ऑगस्ट क्रांती मैदातानूत ‘चले जाव’ चा नारा देत देशभर आंदोलन उभं राहिलं असल्याचं पटोलेंनी सांगितलं