हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं अजून राजकीय नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय दुर्दैवी असून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी सरकारची इच्छा होती का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
केंद्र सरकारने केलेली 102 वी घटना दुरुस्ती ही मराठा आरक्षणाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरली आहे. गायकवाड समितीने त्यांचा अहवाल राज्य सरकारला दिला होता. त्या आधारे राज्याने मराठा आरक्षण कायदा संमत केला होता. केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत जाणिवपूर्णक यामध्ये संदिग्धता ठेवली. असा आरोप नाना पटोले यांनी केला.
संसदेमध्ये कायदा होत असताना अनेक खासदारांनी या घटना दुरुस्तीमुळे राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार जातील याबाबत चिंता व्यक्त केली होती. पण त्यावर केंद्रीय कायदा मंत्र्यांनी राज्याचे अधिकार जाणार नाहीत, असा निर्वाळा दिला होता, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.
फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकण्याचे उद्योग बंद करावेत, असंही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा पूर्ण अभ्यास करून उचित पावले टाकावीत, असंही नाना पटोले म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.