हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतांतरे लपून राहिली नाहीत. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातुन काँग्रेसला पक्षगळती थांबवण्यासाठी काही सल्ले दिले होते. तसेच राहुल गांधी यांना नवीन टीम बनवायलाच हवी असेही म्हंटल होत. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे.
संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, अशा कानपिचक्या नाना पटोले यांनी घेतल्या आहेत. तर आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले –
राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेने काँग्रेसला दिला होता.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.