हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. परंतु राऊतांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नंतर आता प्रणिती शिंदे यांनी देखील सोनिया गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे म्हंटल आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
नाना पटोले संतापले-
काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा