हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी पुढील वर्षभर सोनिया गांधी यांच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुका सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होतील. अशावेळी सोनिया गांधी याच पुढील वर्षापर्यंत काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुका होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसला पुढील वर्षी नवा अध्यक्ष मिळेल आणि तो पूर्ण पाच वर्षे काम करेल.
Elections for Congress president to be held in September 2022: Sources pic.twitter.com/UBVtIHw1rA
— ANI (@ANI) October 16, 2021
दरम्यान, कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींनी पक्षातील जी-२३ नेत्यांना स्पष्ट आणि सूचक संदेश दिला आहे. पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे, असे सोनिया गांधींनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी-२३ ला हे खरमरीत उत्तर दिले आहे.