कोरोना संकटात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नफेखोरी करू नये- सोनिया गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात दररोज वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आज सोमवारी एक व्हिडिओ जारी करत सोनिया गांधी यांनी म्हटलं कि, ‘हा कोरोना संकटाचा काळ असून अशात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून नफेखोरी करू नये, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहे.

आज जारी केलेल्या व्हिडिओत सोनिया गांधी म्हणतात, ‘संकटाच्या काळाचा गैरफायदा घेऊन नफेखोरी करणे ही सरकारची जबाबदारी नसून देशातील जनतेला आधार देणे ही सरकारची जबाबदारी आहे. गेल्या ३ महिन्यांमध्ये मोदी सरकारने २२ वेळा सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. सन २०१४ नंतर मोदी सरकारने कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमतींचा जनतेला फायदा देण्याचे सोडून पेट्रोल आणि डिझेलवर १२ वेळा उत्पादन शुल्क वाढवून १८ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली केली आहे. हे म्हणजे जनतेच्या कमाईतून पैसे काढून सरकारी खजिना भरण्याचे जिवंत उदाहरण आहे.’

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, ‘एकीकडे देश कोरोनासारख्या महासाथीच्या संकटाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा आर्थिक फटका जनतेला बसत आहे. दिल्लीसह देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती ८० रुपये प्रति लिटरहून जास्त झाल्या आहेत. याचा थेट मार शेतकरी, नोकरदारवर्ग, देशातील मध्यमवर्ग आणि छोटे-छोटे उद्योजकांना बसत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. आणि मार्चपासून उत्पादन शुल्कात करण्यात आलेली वाढ देखील मागे घ्यावी.’ दरम्यान, सोनिया गांधींनी १६ जूनला ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ईंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment