70 वर्षात काय केलं? राहुल गांधींचे मोदींना 3 वाक्यात उत्तर

rahul gandhi narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीका करताना सातत्याने काँग्रेसने ७० वर्षात काय केलं ? असा सवाल करत असतात. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ३ वाक्यातच सडेतोड उत्तर दिले आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. याच दरम्यान त्यांनी ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे .

पंतप्रधान अनेकदा विचारतात- ‘70 साल में क्या किया?’ आम्ही भारताला कधीही सर्वाधिक बेरोजगारी दिली नाही. भारताला आजच्या घडीला विक्रमी भाववाढ आम्ही कधीच दिली नाही. भाजप सरकार हे शेतकरी, तरुण आणि महिलांचे सरकार नाही. 5-6 श्रीमंत भारतीयांसाठी हे सरकार आहे जे त्यांना पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यवसायाची मक्तेदारी करत आहेत. असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी रविवारी सकाळी केरळमधील त्रिशूरमधून आपली भारत जोडो यात्रा सुरु केली. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरच्या आकारात कटआउटसह वाढत्या गॅसच्या किमतीवरून जोरदार निदर्शनं केली आणि मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.