महात्मा गांधींच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? राहुल गांधींचा भाजप – संघावर हल्लाबोल

rahul gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला काँग्रेसच्या स्थापना दिनी भाजप आणि संघावर सडकून टीका केली आहे. भाजप आणि संघाचे लोक सांगतात ही आम्ही हिंदुत्ववादी आहे तर ज्यांनी हिंदू धर्म समजवून घेतला आणि आचरणात आणला त्या महात्मा गांधीच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि संघाचे लोक सांगतात की त्यांचा पक्ष एक हिंदुत्ववादी पक्ष आहे. मात्र, मागील शंभर-दोनशे वर्षात एका व्यक्तीने हिंदू धर्म समजून घेतला आणि त्यानुसार आपलं आचरण केलं. ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. ही बाब आम्हीही मानतो आणि आरएसएस-भाजपचे लोकही मानतात. जर महात्मा गांधी यांनी हिंदू धर्म समजून घेतला आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी तो समजून घेण्यात घालवलं. मग संघाच्या विचारधारेनं त्यांच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

गांधीजींच्या फोटोमध्ये तुम्हाला तीन-चार महिला दिसतीलच दिसतील. आपण कधी मोहन भागवतांबरोबर एखाद्या महिलेचा फोटो पाहिलाय का? पाहिलेला नाही, कारण यांची संघटना महिला शक्तीचं दमन करतो आणि आमची संघटना महिला शक्तीला एक व्यासपीठ देतो. भाजपवाले खोटे हिंदू आहेत. हे हिंदू धर्माचा वापर करतात, हे धर्माची दलाली करतात पण हे हिंदू नाहीत असेही राहुल गांधी यांनी म्हंटल.