हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना लसीची नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.
यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना लसीची नाही तसेच लसी कुठे आहेत असा सवालही त्यांनी यावेळी केला. या ट्विट मध्ये त्यांनी लसीकरणाविषयीची आकडेवारी सादर केली आहे
मंत्रियों की संख्या बढ़ी है,
वैक्सीन की नहीं!#WhereAreVaccines pic.twitter.com/gWjqHUVdVC— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 11, 2021
दररोज किमान 88 लाख जणांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र मागील 7 दिवसांत दररोज सरासरी केवळ 34 लाख जणांनाच लसीकरण केलं जात आहे. दुसरीकडे गेल्या 7 दिवसांत दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आहे.