हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीए अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी गेल्या काही दिवसापांसून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून महाविकास आघाडी मधील मतांतरे देखील समोर आली आहेत. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला आहे.
राजीव सातव यांनी ट्विट करत म्हंटल की , सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत. काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी, यूपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी यूपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ,’ असा चिमटा सातव यांनी काढला आहे.
सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे.
बाकी,
युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) March 26, 2021
दरम्यान यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का असा सवाल करतानाच मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.’
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा