ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी.. ; काँग्रेसचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या जाहीर मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे असून सावरकरांवर बोलायची लायकी आहे का? अशा शब्दात त्यांनी घणाघात केला. यांनतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेबद्दल, लायकीवर बोलावं, ही दुर्दैवाची आणि हास्यास्पद गोष्ट आहे, असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.

सचिन सावंत यांनी ट्विटर वर एक विडिओ शेअर करत राज ठाकरेंवर निशाणा साधला. भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे,हे या भाषणानं शिक्कामोर्तब झालं. १६ वर्षात त्यांनी ज्या भूमिका बदलल्या त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. राजकीय यश मिळत नाहीत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते दुसऱ्यांवर आणि माध्यमांवर खापर फोडत आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

ज्या पक्षाला जनतेला ब्लू प्रिंट देणार असं आश्वासन देऊन ती अजून देता आली नाही. ते स्ट्रॅटजीबद्दल बोलतात ही विरोधाभासी गोष्ट आहे. तसेच ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेबद्दल, लायकीवर बोलावं, ही दुर्दैवाची आणि हास्यास्पद गोष्ट आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.