Thursday, March 30, 2023

नरेंद्र मोदी हे लबाडांचे सरदार; काँग्रेसची जहरी टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लबाडांचे सरदार आहेत अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. गुजरात येथील आदिवासीबहुल नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना खर्गे यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. खर्गे म्हणाले, मोदी-शहा हे काँग्रेसने ७० वर्षांत काय केले असे विचारतात, पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, काँग्रेस नसती तर तुम्हाला लोकशाही मिळालीच नसती.’

‘मोदी केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी सातत्याने स्वतःला गरीब म्हणवून घेतात. परंतु मी स्वतः गरीबातील गरीब आणि अस्पृश्य जातीतून आलो आहे. लोक निदान तुमचा चहा तरी लोक पितात. लोक माझा चहाही पीत नाहीत असं खर्गे म्हणाले.

- Advertisement -

मोदी एकामागून एक खोटे बोलत आहेत. खरं तर मोदी हे लबाडांचे सरदार आहेत. त्यांचे सरकार श्रीमंतांना सोबत देशाला लुटत आहे. आणि आरोप मात्र काँग्रेसवर करत आहेत. तुम्ही गरिबांच्या जमिनीही लुटताय आणि आदिवासींना जमिनी देत ​​नाही. जमीन, पाणी, जंगल कोण वाया घालवतंय? तुम्ही आणि तुमच्या पाठीशी उभे असलेले श्रीमंत लोक आम्हाला लुटत आहेत.