हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी वाझे आणि परमबीस सिंह प्रकरणावरून भाजपाला प्रत्युत्तर दिलं. अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये परबीर सिंह यांना पंतप्रधानांनी आपल्या अधिकारात बडतर्फ करावं. कलम ३११चा वापर करून बडतर्फ करण्याची मागणी भाजपाने केली होती. अचानक परमबीर सिंह हे लगेचच प्रिय झाले. भाजपाला विश्वासार्ह वाटायला लागले. असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या 100 फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे. तसेच वाझे वारंवार सिंग यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणात एनआयए सिंग यांची चौकशी का करत नाही? सिंग यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे.
सीताराम कुंटे हे चांगले अधिकारी आहेत. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात. दुसरीकडे कुंटे यांच्या अहवालावर अविश्वास दाखवतात. हा विरोधाभास असून कुंटे यांच्या अहवालाने विरोधकांच्या मुद्द्यातील हवाच निघून गेली आहे, असं ते म्हणाले. जो पेन ड्राईव्ह सरकारला देण्यात आलेला नाही, तो फडणवीसांकडे आलाच कसा?असा सवाल करत सचिन सावंत यांनी भाजपवर आरोप केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group