हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील ठाकरे सरकार घाबरते म्हणून त्यांनी औरंगाबाद यथील सभेत अटी आणि नियमांचे उल्लंघन करूनही सरकारने राज ठाकरेंवर कारवाई केली नाही असं म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीच आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी 12 अटींचं उल्लंघन केलं. त्यावेळी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. राणा दांपत्यांवर कारवाई झाली ते योग्य झालं पण राज ठाकरेंवर कारवाई का केली नाही? असा सवाल करत राज्यातील ठाकरे सरकार राज ठाकरे याना घाबरते असं संजय निरुपम यांनी म्हंटल. राज्यात जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणं आवश्यक असल्याचं सांगत संजय निरुपम यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. तसंच राज ठाकरेंवर मुंबई पोलिसांकडून कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहीजे असेही संजय निरुपम यांनी म्हंटल . राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, त्यांच्या मनाला ठेच पोहोचवली आहे, त्यांनी अयोध्येला जाण्याआधी लोकांची माफी मागावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली