….तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

0
44
Prakash ambedkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला  दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींसोबत ते बोलत होते.

राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलाॅक करण्यात आले असून, तेथील सर्व व्यवहार सुरळीत होतील, पाच स्तरावर अनलाॅकची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची घोषणा मदत व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. परंतू तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात अॅड आंबेडकर यांनी मत व्यक्त केले

एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाहीत. टीका करायची टीका करा आणि सत्तेत राहायचं असेल तर सतेत राहा, वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा निर्णय बदल करून लागू केला, तर हा मंत्र्यांचा अपमान आहे. म्हणून दोघांपैकी एकाने राजीनामा द्यावा, असा सल्ला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here