हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने धार्मिक कार्यक्रम घेण्यावरती निर्बध घातले. त्यामुळे आता महाराष्ट्रात आषाढी एकादशीची वारीही राज्य सरकारने रद्द केली. या सरकारने घेतलेल्या निर्णयावरून भाजपमधील अनेक नेत्यांकडून टीका करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विट करून टीका केली आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, कावड यात्रा बंद करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री जनतेच्या जीवाशी खेळ नको व देवालाही हे आवडणार नाही असे म्हणतात. आपल्या हीन राजकारणासाठी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या राज्यातील भाजप सरकार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता जनतेची माफी मागावी. आता कुठे गेले ते भाजपा अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?,” असे सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे.
कावड यात्रा बंद करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री जनतेच्या जीवाशी खेळ नको व देवालाही हे आवडणार नाही असे म्हणतात. आपल्या हीन राजकारणासाठी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या @BJP4Maharashtra व @ChDadaPatil यांनी आता जनतेची माफी मागावी. कुठे गेले ते भाजपा अध्यात्मिक आघाडीचे थोतांड? pic.twitter.com/qbcbApyzpL
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 14, 2021
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला असल्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने आषाढी वारीस सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. वारी रद्द करण्याचा निर्णय घेत सरकारने वारकरी वर्गाचे म्हणणे समजुन घेत काही मोजक्याच दिंडीना एसटीमधून पंढरपूरला घेऊन जायला परवानगी दिली आहे. यावरून भाजपकडून राज्य सरकारवर टीकास्त्र डांगळे गेले होते.
भाजपने टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला तुम्ही जेव्हा पंढरपूरला याला तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच अभिषेक करा,” असा उपरोधिक टोलाही भाजपने मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला होता. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप व चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.