हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत विनंती केली होती. मात्र, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवत या निवडीवरच आक्षेप घेतल्यामुळे आघाडी सरकारपुढे अध्यक्षाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवरच हल्लाबोल केला. अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांची भूमिका अयोग्य आहेर. आता राज्यपालांनाच बरखास्त करण्याची वेळ आली आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काल आमच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यांना निवडीसंदर्भात सर्व माहितीही दिली. मात्र, कायद्याचा आड घेत राज्यपालांनी हि निवड प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न केला. यावरून एकच दिसते कि भाजपचा अजेंटा राज्यपाल चालवतात का? असा सवाल पटोले यांनी केला.
विधिमंडळ हे स्वतंत्र आहे. त्याचे स्वतःचे नियम आहेत. आणि विधिमंडळाच्या कामकाजात अडचण निर्माण करण्याचे काम होत असेल तर राज्यपालांच्या बरखास्ती संदर्भात मागणी करावी लागेल. कारण या पद्धतीची हि लोकशाही होऊ शकत नाही, असे मत पटोले यांनी यावेळी व्यक्त केले.