हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात झालेल्या नुकसानीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे. “राज्यात सतत ओला दुष्काळ निर्माण होत आहे. राज्यात होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनातील कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने राज्यांना देणे लागते. मात्र, तसे होताना दिसत नाही. आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना भाजप बघत आहे, अशी टीका करीत पटोलेंनी “अजून किती बलिदान यांना पाहीजे आहेत. हे जर थांबले नाही तर महाराष्ट्र बंदची हाक देऊ,” असा इशारा दिला.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “राज्यातील अतिवृष्टीतील नुकसानीवरून भाजपकडून राजकारण केले जात आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात घडलेल्या घटनेत शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतही मोदी सरकार राजकारण करत आहे.
ही काय तानाशाही आहे काय?
अन्नदाता याच्या अंगावर गाडी चालवून त्यांचे जिव घेणे ही तर भारतीय जनता पक्षाची गुंडागर्दीच झाली.
आता शेतकरी हा भाजप ला धडा शिकवणारच. https://t.co/735KYR6zaX
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 3, 2021
राज्यातीलशेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडून मदत देणे आवश्यक आहे. मात्र, ती देण्यात आलेली नाही. भारतात भाजपने जी तालिबानी वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचे खरे रूप हे उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात घडलेल्या घटनेवरून पहायला मिळत असल्याची टीकाही पटोले यांनी यावेळी केली.