हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती मात्र काँग्रेसकडून हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हंणून काँग्रेसनं आंदोलन मागे घेतलं आहे
मुंबईकरांची अडचण होऊ नये म्हणूनच आम्ही आंदोलन थांबवत आहोत असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला . आजचं आंदोलन थांबलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने सागर बंगल्यावरील आंदोलन थांबवलं असलं तरी भाजपच्या कार्यालयांवर होणारं आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही पटोले यांनी आज स्पष्ट के
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान झालेला भाजपला चालतो. मात्र, महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधानांचा निषेध राज्यातील भाजप नेते घेत नाहीत. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल. मात्र, मोदींविरोधात बोलणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. आज भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघड झाला असल्याची टीका पटोले यांनी केली.