हिटलर की मौत मरेगा मोदी; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. मोदी हिटलरच्या पाहुलावर पाऊल टाकून काम करत असतील तर हिटलर सारखेच त्यांचा मृत्यू होईल अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. अग्निपथ योजने विरोधात काँग्रेस कडून निदर्शने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सुबोधकांत सहाय म्हणाले, मला वाटते की मोदींनी हिटलरचा सर्व इतिहास ओलांडला आहे. हिटलरनेही अशी एक संघटना तयार केली होती, तिचे नाव खाकी होते. मोदींनी हिटलरचा मार्ग अवलंबला तर हिटलर सारखाच त्यांचा मृत्यू होईल. हा देश काँग्रेस पक्षाच्या हुतात्म्यांच्या परंपरेचा पक्ष आहे हे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले.

 

काँग्रेसमध्ये ‘शहीदांची’ मोठी यादी आहे, मात्र लक्ष्मणरेषा कोणीही ओलांडली नसल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी पंतप्रधानपद नाकारत असताना त्यांचा माईक हिसकावून आम्ही बोललो होतो की, आम्ही तुमच्या नावावर निवडून आलो आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला पंतप्रधानपद नाकारू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. अशा नेहरू-गांधी घराण्याकडे बोट दाखवण्याचे काम सुरू असल्याचे सुबोधकांत सहाय म्हणाले. दरम्यान, मोदींबाबत हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर या वक्तव्यानंतर सुबोधकांत सहाय यांच्यावर चौफेर टीका होत आहे.