हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली.
महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नाही. याउलट शिवसेना जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या पोटनिवडणुकी साठी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठं बळ मिळणार आहे.
दरम्यान , रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची जागा रिक्त होती. उद्धव ठाकरेंनी ऋतुजा या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी लटकेंना उमेदवारी जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी नोव्हेंबरला मतदान होणार असून ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
खरं तर अंधेरी पूर्व हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र २०१९ ला शिवसेना- भाजप युतीत शिवसेनेनं बाजी मारत अंधेरीत भगवा फडकावला होता. तेव्हा रमेश लटकेंना ६२ हजार मते मिळाली होती तर काँग्रेसच्या अमिन कुट्टींना २८ हजार मतं मिळाली. अपक्ष मुरजी पटेलांना ४५ हजार मते पडली होती. भाजपाने आतल्या अंगाने पटेलांना मदत केल्याच्या चर्चाही तेव्हा रंगल्या होत्या. आता काँग्रेसने थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.