कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
काॅंग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी ठोस पाऊले उचलली आहेत. खा. राहूल गांधी यांच्या अभ्यासू नेतृत्वात काॅंग्रेसची वाटचाल भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची भिती मनामध्ये न बाळगता कार्यरत रहावे. खा. राहुल गांधी यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन पक्षकार्यात झोकुन द्यावे, असे आवाहन सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष झाकीर पठाण यांनी केले.
सातारा जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा काँग्रेस मधील कार्यकर्त्याच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी झाकीर पठाण बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नदीम मुजावर, सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय साळुंखे, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे, सातारा शहर काँग्रेस महिला अध्यक्ष रजिया शेख, तालुका अध्यक्ष हानिफ मुल्ला, नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस गायकवाड, सातारा जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष अमीरभाई अत्तार, इजाज शेख, जेष्ठ नेते अन्वर पाशा खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हयातील काँग्रेस पक्षातील संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी मरगळ झटकूण कामाला लागावे. पक्षसंघटना बळकट करण्यामध्ये आपले मोलाचे योगदान दयावे, असे आवाहन सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केले. प्रास्ताविक मनोज तपासे यांनी केले. आभार अॅड. समीर इनामदार यांनी केले.